जैन पाठशाळेत आर्यनंदि महाराज जयंती साजरी...
जामनेर: पारसनाथ देवस्थान, जामनेर संचालित विशेषसागरजी जैन पाठशाळेत तीर्थरक्षा शिरोमणी १०८ आर्यनंदि महाराज यांची ११७ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आर्यनंदि महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष पारसनाथ देवस्थान जामनेर चे अध्यक्ष प्रकाश सैतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. आर्यनंदि महाराज यांनी भारतातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी केलेली विविध कामे तसेच धर्म प्रभावना, गरजू विद्यार्थ्यांसाठी उभारलेले गुरूकुल. समाज संघटन करुन मजबूत कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी केलेल्या प्रयत्न या संदर्भात महाराजांच्या आठवणींची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सैतवाल यांनी आपल्या भाषणात विषद केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना फलहाराचे वाटप करण्यात आले.
तसेच पाठशाळेत धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरे घेण्यात आली ऐनवेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थी सरस ठरले. त्यांचे ज्ञान पदाधिकाऱ्यांना थक्क करणारे होते. हे पाहून पाठशाळेच्या शिक्षिका सौ. संगिता कस्तुरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून देवस्थान चे उपाध्यक्ष भरतशेठ सुर्यवंशी, सचिव राजेंद्र जैन, सहसचिव संजीव सैतवाल, अ.भा. सैतवाल संस्थेचे तालुका अध्यक्ष प्रशांत सैतवाल, हिशोबतपासणीस दिनेश सैतवाल हे होते.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक कस्तुरे, संगिता कस्तुरे, महावीर सैतवाल, दिपाली कस्तुरे यांनी प्रयत्न केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा