महाराष्ट्र
मंद्रुप येथे गुणवंत खेळाडूंचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : न्यू गोल्डन क्लबने गेल्या पंधरा वर्षांपासून मंद्रूप व परिसरातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून गावाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा दुध संचालक सुरेश हसापुरे यांनी केले, येथील न्यू गोल्डन क्लबच्या १५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपसरपंच भगवान व्हनमाने, सहायक पालिस निरीक्षक प्रशांत हुले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळे, आर . के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, यासीन मकानदार, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन ख्याडे, अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष उमाशंकर रावत, वंचितचे तालुकाध्यक्ष सचिन फडतरे, जेष्ठ पत्रकार अमोगसिद लांडगे, पत्रकार अमोगसिद मुंजे,समीर शेख, अशोक सोनकटले,अनिल जोडमोटे, कुरघोटचे माजी सरपंच भागण्णा अटकर, सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब शिळ्ळे, उद्योजक शिवानंद कालदे, निलेश हेळकर, प्रिती कोरे, प्रविण कुंभार, उमाशंकर रावत, शिवराज मुगळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी केले तर प्रास्ताविक बबलू शेख यांनी केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा