सीएनजी व एलपीजी इंधनावर चालणा-या ऑटोरिक्षाकरिता सुधारित वयोमर्यादा लागू.... - दैनिक शिवस्वराज्य

सीएनजी व एलपीजी इंधनावर चालणा-या ऑटोरिक्षाकरिता सुधारित वयोमर्यादा लागू....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर :- महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निर्णयानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यक्षेत्राकरिता निश्चीत करण्यात आलेल्या वयोमर्यादेत सीएनजी व एलपीजी इंधनावर चालणा-या ऑटोरिक्षाकरिता सुधारित वयोमर्यादा लागू करण्यात येत आहे.
      जे परवानाधारक पेट्रोल ऑटोरिक्षा दिनांक 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एलपीजी इंधनावर रुपांतरीत करून घेतील अशा रिक्षा मुळ नोंदणी दिनांकापासून 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरुन उतरविण्यात येतील. तसेच जे परवानाधारक पेट्रोल ऑटोरिक्षा दिनांक 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सीएनजी इंधनावर रुपांतरीत करून घेतील अशा रिक्षा मुळ नोंदणी दिनांकापासून 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरुन उतरविण्यात येतील. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सोलापूर यांचे कार्यक्षेत्राकरिता सदरचा निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून लागू राहील. असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी कळविले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads