जामनेर वाकी रोड कॉलनी परिसरात तुडुंब भरलेल्या गटारींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर वाकी रोड कॉलनी परिसरात तुडुंब भरलेल्या गटारींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
दि.11/जामनेर नुकत्याच झालेल्या पावसामुळे जामनेर शहरात बहुतांश ठिकाणी नाले~गटारी साफ न केल्याने रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील वाकी रोड कॉलनी परिसरात ठिकठिकाणी नगरपालिका विभागाकडून गटारी साफ सफाई न केल्याने नाले व गटारी तुडुंब भरलेल्या असून यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
∆राज्यात बहुतेक ठिकाणी मॉन्सून दाखल झाला असून गेल्या 4 ते 5 महिन्यां पासून उकाड्याने हैराण झालेले नागरिक तसेच बळीराजा हा या बरसलेल्या पावसाने सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्याच जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना फटका बसला असून जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले ठिबक संच,तर काही शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.जामनेर तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे.जामनेर नगरपालिके ने पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाले~गटारी साफ~सफाईची कामे हाती घेणे गरजेचे असतांना शहरातील बहुतांश भागातील काही ठिकाणी जुन्या तर काही ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या गटारी घाण पाणी~कचरा साचल्यामुळे तुडुंब भरलेल्या दिसून येत आहेत.जोरदार पाऊस पडला की या गटारी नाल्याचे पाणी रस्त्यावर साचतांना दिसून येतअसते.न.पा.प्रशासनाने मॉन्सून पूर्व शहरातील गटारी नाले सफाई अभियान राबविणे गरजेचे असताना शहरातील बहुतांश भागातील साचलेल्या गटारी नाले यावरून न.पा.चे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.शहरातील वाकी रोड,पाटील वाडी,स्टेट बँक परिसर,तसेच आजूबाजूच्या परिसरात ठिकठिकाणी गटारी व नाल्यात साचलेल्या घाण पाण्यामुळे मच्छारांची उत्पत्ती वाढीस लागत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.स्टेट बँकेच्या समोर असलेल्या बहुद्देशीय हॉल च्या समोरील भिंतीला लागून मोठा नाला आहे, आणि त्यालाच लागून नाला सदृश्य गटार असून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणची गटार साफ केल्या गेलेली नाही.न.पा.प्रशासन दरवर्षी शहर स्वच्छते साठी लाखोंचा निधी खर्ची घालत असताना या वॉर्डातील स्वच्छते कडे न.पा.प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.पावसाळ्यात या कॉलनी परिसराला तळ्याचे स्वरूप येत असते.अनेकदा येथील रहिवाश्यांच्या घरात या पाण्यातून साप,धामिन,विंचू अशी जीवघेणे प्राणी शिरतात.या भागातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात आपल्या लहान मुलां सोबत जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याचे येथील रहिवाश्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.शहरात डेंग्यू,मलेरिया,या सारख्या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये.संभाव्य धोका लक्षात घेता न.पा.प्रशासनाने तात्काळ शहरातील वाकी रोड सह अन्य भागातील गटारी नाले सफाईची कामे हाती उपाय योजना राबवावी अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads