महाराष्ट्र
कामती(ब्रु) येथे दुर्गा माता यात्रा ऊत्साहात संपन्न ...
समीर शेख प्रतिनिधी
कामती : कामती येथील लमाण तांडा येथे दुर्गा माता यात्रा उत्साहात संपन्न झाली. दुर्गा माता यात्रेनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
यावेळी हे रक्तदान शिबिराचे आयोजन शरद ( दादा) प्रतिष्ठान याच्यांकडून करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामस्थ व पंचक्रोशीतील 50 नागरिकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरास पंचक्रोशीतील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी बाहेरगावी गेलेले नोकरदार वर्ग बहूसंख्येने कामती मध्ये उपस्थित राहून यात्रा चा आनंद घेतला.
यात्रा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी अशोक राठोड , प्रतापसिह राठोड,भिलू राठोड ,लालू पवार, लहू पवार, ,बासू राठोड,तानाजी नाईक, विकास राठोड,सोमनाथ राठोड, अविनाश राठोड,विकी राठोड,अवि पवार , आकाश राठोड,साहिल राठोड,राहुल राठोड, अभिषेक राठोड,शंकर राठोड,कुमार नाईक, नेताजी पवार,राकेश चव्हाण,प्रकाश राठोड,शिवाजी चव्हाण, राहुल चव्हाण,विकास द राठोड, आकाश राठोड ,सचिन पवार विकास राठोड, राजू राठोड यांचे सहकार्य लाभले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा