चिंचखेडा बु.बालिका अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीच्या ताब्यासाठी जमावाची पोलिसांवर दगडफेक..
जामनेर,दि.23 जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बु. केकतनिंभोरा परीसरात एका 6 वर्षीय बालिकेवर एका नराधमांने अत्याचार करीत बालिकेचा हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.तर सदर या प्रकरणातील आरोपी हा 10 ते 12 दिवसांपासून फरार झालेला होता.भुसावळ तालुक्यातील एका गावाजवळ लपून बसल्याची माहिती मिळताच या फरार आरोपीस भुसावळ पोलीसांनी अटक केली होती. हा आरोपी जामनेर येथे आणत असल्याची माहिती मिळाल्याने पिडीतेच्या नातेवाईक यांच्या सह जमावाने नराधम आरोपीचा ताबा मिळविण्यासाठी जामनेर शहरातील भुसावळ चौफुली येथे मोठय़ा प्रमाणात जमाव जमवून ठिय्या आंदोलन सुरू केले होते.संतप्त झालेल्या जमावाने "आरोपीला आमच्या ताब्यात द्या" अशी मागणी करीत काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी सुमारे 7 ते 8 टायरांची जाळपोळ करून इतर वाहनांना सुद्धा लक्ष करुन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.संतप्त जमावाने काहीच विचार न करता जामनेर पोलीस ठाण्यावर प्रचंड दगडफेक करून पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराने शहरात दंगल सदृश्य परीस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या जमावाने सरळ पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली.जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना हवेत फायरींग सह सौम्य लाठी चार्ज करावा लागला.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जादा कुमक पाचारण झाल्यानंतर काही तासातच परीस्थिती नियंत्रणात आली.परंतु जमावाच्या हल्ल्यात जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या सह सुमारे 10 ते 18 पोलीस व होमगार्ड गंभीरपणे जखमी झाले असुन गंभीर जखमी झाले आहेत.आंदोलन कर्ते व पोलीस दलात सुरू असलेल्या चकमकीत पोलीस कर्मचारी जखमी होतांना पाहून यावेळी जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना क्षणाचाही विलंब न करता सुरक्षित स्थळी पोहचवण्या साठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड समादेशक.भगवान पाटील व त्यांचे होमगार्ड कर्मचारी हे जिवाचे रान करतांना दिसून येत होते.हल्ल्यातील जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.पोलीसांनी 15 संशयित आरोपींना अटक केली. जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शहरास भेट देऊन परिस्थीतीची पाहणी केली आहे.घडलेल्या घटनेमुळे शहरात सर्वत्र तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. (दि.21)रोजी शहरात राज्य राखीव दलाच्या तुकडी सह दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे.मोठय़ा बंदोबस्तामुळे जामनेर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तसेच नागरीकांच्या मनातील भय निवारणासाठी पोलीस प्रशासना कडून रुट मार्च काढण्यात आला.तर नागरीकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपले दैनंदिन कार्य व व्यवसाय सुरू ठेवावे.तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरीकांनी सुद्धा पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चाळीसगांव उपविभागीय पोलीस अधिकारी~कविता नेरकर~पवार यांनी केले आहे.जखमी झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी खालील प्रमाणे~
1)~पो. नि. किरण शिंदे.
२)~पो.उप.नि. दिपक रोटे.
३)~रमेश शंकर कुमावत.
४)~रामदास कुंभार.
५)~सुनिल दिपचंद राठोड.
६)~प्रितम सुधाकर बरकले.
७)~हितेश गणेश महाजन.
८)~संजय शांताराम खंडारे.
९)~अतुल सुभाष पवार.
१०)~आकाश गोकुळ पाटील.
११)~भावेश प्रकाश देवरे.
१२)~कृष्णा नामदेव शेळके.
१३)~मेहुल मनोज कुमार शहा.
१४)~राहुल प्रमोद निकम.
१५)~उत्तम विठोबा चौधरी.
१६)~किशोर चंदनकर.
१७)~जितेंद्र नथ्थु ठाकरे.
१८)~विजय सुनिल काळे.
सदर या जमावाच्या हल्ल्यातील आरोपींनी दगड विटा व अन्य शस्त्र यांचा वापर केला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा