महाराष्ट्र
रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचा कार्यकर्ता संवाद दौरा....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचा कार्यकर्ता संवाद दौरा रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर व रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव श्रीपती ढोले यांच्या नेतृत्वाखाली दि. 21जुन ते 25 जुन पर्यंत आयोजित करण्यात आला होता. तरी या दौऱ्याची सांगता दि. 25 जुन रोजी रिपब्लिकन सेना सोलापूर शहर जिल्हा यांच्यावतीने सात रस्ता येथील रेस्ट हाऊस येथे संपन्न झाला.
यावेळी हा कार्यक्रम रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरुवातीला रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाज भूषण काकासाहेब खंबाळकर व सचिव श्रीपती ढोले यांना फेटा ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व तसेच सर्व उपस्थिती मान्यवरांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला .
हा कार्यक्रम रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, सोलापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी राजशेखर चंदनशिवे व सर्व टीमच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर गायकवाड, सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वैशाली अमित गायकवाड, वडापूर गावच्या ग्रामपंचायत सदस्य बायडा सिद्धार्थ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नाना रणसिंगारे, गंगाधर घोडेश्वर, सुबोध सोनकांबळे, कोंडीबा कांबळे, नितीन भंडगे, शहराध्यक्ष रमेश मंठाळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच यावेळी माढा लोकसभा विभाग रिपब्लिकन सेना अध्यक्षपदी भारत तुळशीराम सरवदे यांची निवड करण्यात आली व माढा लोकसभा विभाग रिपब्लिकन सेना जनरल सेक्रेटरीपदी सत्यजित सुरवसे यांची निवड करण्यात आली आणि रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी मनोज सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र दि. 30 जुलै रोजी आंबेडकर भवन दादर मुंबई येथे होणाऱ्या बैठकी मध्ये देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा