महाराष्ट्र
अलगोंड-पाटील यांनी उभारला महाराष्ट्रातीलसर्वात मोठा सॅन्ड क्रशर व सॅन्ड वाशिंग प्लांट ; रविवारी होणार उदघाटन...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : टक्के सिमेंटचे बचत करणारे नदीतील वाळूपेक्षा अधिक स्वत आणि दीर्घकाळ टिकणारे कृत्रिम वाळूची निर्मिती करणारे तीस कोटी खर्चाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सॅन्ड क्रशर प्लांटचे तसेच देशातील सर्वात मोठे सॅन्ड वाशिंग प्लांटचे उदघाटन रविवार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थिती दहिटणे येथे पार पडणार असल्याची माहिती युवा उद्योजक राहुल परमानंद अलगोंड-पाटील व रोहन परमानंद अलगोंड-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जुळे सोलापूर येथील त्यांच्या कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषद बोलताना ते बोलत होते. यावेळी उद्योजक परमानंद अलगोंड- पाटील, माजी सभापती इंदुमती अलगोंड-पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्योजक राहुल अलगोंड-पाटील म्हणाले, नदीचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने बऱ्याच वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद झाला आहे. त्यामुळे
अनेक बांधकामे रखडले होते. याचा थेट परिणाम या क्षेत्रातील बांधकाम मजुरांवर झाला होता. वाळू उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम खर्चात वाढ होत आहे. लहानसहान व्यावसायिकांना वाळू उपलब्धतेसाठी धावाधाव करावी लागत आहे. सामान्य माणूस अडचणीत आला असून घरबांधणीसाठी वाळू खरेदी करताना त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचले आहे. याला उत्तम पर्याय कृत्रिम वाळू हाच आहे.
नदीतील वाळूमध्ये तीस टक्के माती असते त्यामुळे बांधकाम मजबूत होत नाही मात्र आमच्या प्रकल्पातील कृत्रिम वाळूमध्ये केवळ पाच टक्के माती असते त्यामुळे बांधकाम हे अत्यंत मजबूत होते आणि दीर्घकाळ टिकते. या दोन्ही प्रकल्पासाठी तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या बाजारात कृत्रिम वाळू हे दर्जेदार मिळत नाही ही बाब लक्षात घेऊनच आम्ही अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृत्रिम वाळू उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असून त्या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प उभारण्यात आली आहे. शिवाय सॅन्ड वॉशिंग प्लांटमध्ये कृत्रिम वाळू ही डायमंड हि-याच्या आकाराप्रमाणे अत्यंत स्वच्छ केली जाते.याचा फायदा बांधकामाच्या मजबूतीला होणार आहे.
या दोन्ही प्रकल्पाचा फायदा सोलापूर जिल्ह्यासह लातूर उस्मानाबाद सातारा पुणे यास कर्नाटक राज्याला होणार आहे येथील बांधकामासाठी आमच्या प्लांटमधील उत्पादनाची मागणी होत आहे.सध्या व भविष्यातही
सर्वच बांधकामासाठी तसेच
घरकुल, शौचालय, रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स, काँक्रीट रस्ते, मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्ट, रेडिमिक्स फ्लॅट, प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूच पर्याय असणार आहे. या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता वाढते आहे.हे नाकारून चालणार नाही.
सध्याची व भविष्याची गरज ओळखूनच आम्ही या दोन मोठ्या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या दोन्ही प्रकल्पाचा रविवारी, दहिटणे-हगलूर रोड ( सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग रोडवर) उदघाटन होत आहे. या कार्यक्रमास जनतेनी उपस्थित राहावेत असे आवाहन अलगोंड-पाटील यांनी केले आहे.
दर्जा व गुणवत्तेला प्राधान्य...
प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक कै. भीमराव पाटील वडकबाळकर यांनी चाळीस वर्षे दर्जेदार रस्ते इतर बांधकाम केले आहेत. आपले वडील परमानंद अलगोंड- पाटील यांनीही हीच परंपरा कायम ठेवली आहे. आपण २०१६ मध्ये arpi group and companyies या कंपनीची स्थापना केली आहे. आमच्या कंपनीने विविध राष्ट्रीय महामार्ग तसेच शहर व जिल्हात दर्जेदार रस्ते बांधले आहेत. आम्ही विश्वासार्हता व दर्जा नेहमीच जपला आहे असे युवा उद्योजक राहुल अलगोंड-पाटील यांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा