जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आय पी ए कडून कुपोषित बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आय पी ए कडून कुपोषित बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रात धडक अंगणवाडी तपासणी मोहिमेंतर्गत तपासणी झालेल्या बालकांमधून कुपोषित बालकांसाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे विषेश तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरी पुजनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 
आरोग्य विभाग,महिला बालकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन पेड्रीटीयाटिक असोसिएशन चे सदर शिबिरास अनमोल सहकार्य लाभले.
डॉ.अमोल शेठ,डॉ.सतीश चौधरी,डॉ.संदीप पाटील,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.राहुल निकम या बालरोग तज्ञांच्या मार्फत कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 
एकूण २८३ जणांच्या तपासणीतून ३४ बालकांना जिल्हारुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले.
समता फाउंडेशन मार्फत अतिरिक्त औषध पुरवठा करण्यात आला.
शिबीर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.नरेश पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.चंद्रमणी सुरवाडे,डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.धंनजय पाटील,डॉ.अनिता राठोड,डॉ.विजया पाटील,डॉ.स्वाती विसपुते, डॉ.निलेश चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील,संघमित्रा सोनार अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व राष्ट्रीय बाल स्वास्थ टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads