महाराष्ट्र
साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी येथे दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.....
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर या प्रशालेमध्ये दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आनंदकुमार अंत्रोळीकर होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंद्रूप पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले हे उपस्थित होते.
प्रथमता कै. नानासाहेब अंत्रोळीकर कै. वसंतराव आपटे व कै. देशभक्त कृ .भी. अंत्रोळीकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर इयत्ता दहावी मधील प्रथम क्रमांक रेहान रसूल शेख 85%, द्वितीय क्रमांक नाझिया गुलाब शेख 82 .60% ,तृतीय क्रमांक अंजली महासिद्ध होनमाने 80.20% व तसेच इयत्ता बारावी मधील प्रथम क्रमांक स्वप्नाली लक्ष्मण शिंगाडे 67. 33%., द्वितीय क्रमांक सोनाली आप्पाशा रुगी 63.83% व तृतीय क्रमांक ज्योती अर्जुन सुळे 63.67% या सर्व यशस्वी विद्यार्थांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले, संस्थेचे संचालक मजनोद्दीन पठाण, मंद्रूप पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी सागर चव्हाण, गावचे माजी सरपंच रवींद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करावा इंजिनीयर व तसेच प्रोफेसर अशा उच्च पदापर्यंत पोहोचावे व आपल्या गावामध्ये कै. नानासाहेब अंत्रोळीकर या अभ्यासिकेत येऊन स्पर्धात्मक परीक्षेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे, गावाचे नाव कमवावे असे विचार व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले बोलतांना म्हणाले की, मी एक शेतकरी सुपुत्र असून माझ्या या यशस्वीतेच्या पाठीमागे माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहे व तसेच विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी व स्पर्धात्मक परीक्षेतून उच्च पदापर्यंत पोहोचावे असे विचार व्यक्त केले . त्याचबरोबर संस्थेचे संचालक मजनुद्दीन पठाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमानंतर कै.नानासाहेब अंत्रोळीकर अभ्यासिकेला एपीआय प्रशांत हुले यांनी भेट देऊन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख सर, दिलशाद पठाण मॅडम, गजानन कोले सर, दत्तात्रय शिंदे सर, रवींद्र गावित सर, म्हाळाप्पा वडरे सर, बसवराज चौगुले सर, शर्मा सुतार, उमाकांत कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळाप्पा वडरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय शिंदे सर यांनी मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा