महाराष्ट्र
अंत्रोळी येथील जि.प.प्राथमिक शाळेत व साने गुरुजी विद्यामंदिर शाळेत एम के फाउंडेशन व सागर सिमेंट याच्याकडून विद्यार्थांना वह्या वाटप.... विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे जाणीव ठेवावे : महादेव कोगनुरे
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (अंत्रोळी) : सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनुरे यांच्या हस्ते अंत्रोळी, ता. द. सोलापूर येथे एम. के. फाउंडेशन च्या मार्फत वह्या वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी जि. प. शाळा अंत्रोळी, जि. प. शाळा हनुमान नगर आणि साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, अंत्रोळी येथील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
समाजातील वंचित व उपेक्षित विद्यार्थांना विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातील अनेक समस्या ती उंचीच सोडवते. या धर्तीवर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे हि मोठी समाजाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून दरवर्षी एम के फाऊंडेशन च्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे लाखो विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देवून महत्वपूर्ण वाटा उचलतात.
गरीब, कामगार, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी एम. के. फाउंडेशन कडून होत असलेल्या मदतीबद्दल पालक आणि शिक्षकांनी आनंद व्यक्त केले.
यावेळी महादेव कोगनूरे म्हणाले की, हाती घेतलेले समाज उपयोगी कार्य निरंतर अनेक वर्षांपासून चालू आहे, यामध्ये कधी खंड पडणार नाही, शिक्षण प्रत्येकासाठी अति आवश्यक बाब आहे, आणि त्यासाठी माझ्या परिने होईल तशी सेवा कायम करेन असे मत यावेळी व्यक्त केले.व तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्टाचे जाणीव ठेवून अभ्यास करून मोठ्या अधिकारी, व्यापार व उद्योगधंदे करावे असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सरपंच मायाताई सलगरे, माजी ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत कोकरे, ग्रामसेवक गणेश फडतरे, ब्रह्मदेव सलगरे, अजित पाटील, मंहातेश बगले, एम. के. फाउंडेशन चे पदााधिकारी व साने गुरुजी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शेख सर,दत्तात्रय शिंदे सर, वडरे सर व सर्व शिक्षक,जि.प.प्राथमिक शाळा अंत्रोळीचे बन्ने सर, गायकवाड सर व सर्व शिक्षक,जि. प. प्राथमिक शाळा हनुमानगर शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर, संजीव चाफाकरंडे सर, ग्रामपंचायत सदस्य इन्नुस शेख, बाबासाहेब बंडगर,डाॅ.आदिनाथ खरात, दावल शेख, पत्रकार समीर शेख, पत्रकार अभिजीत जवळकोटे, नबीलाल शेख, दावल शेख,सैफन शेख, साहिल शेख, ग्रामपंचायत शिपाई नाथजी केंगार व सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा