मंद्रूपच्या इतिहासात पहिल्यांदाच कवालीचा कार्यक्रम ; सोनाई फाउंडेशनचे युवराज भैय्या राठोड यांचा उपक्रम हिंदू मुस्लिम- शीख-ईसाई एक है,सबका हिंदुस्तान है कव्वालीने गायनाचा प्रारंभ.... - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूपच्या इतिहासात पहिल्यांदाच कवालीचा कार्यक्रम ; सोनाई फाउंडेशनचे युवराज भैय्या राठोड यांचा उपक्रम हिंदू मुस्लिम- शीख-ईसाई एक है,सबका हिंदुस्तान है कव्वालीने गायनाचा प्रारंभ....


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे पहिल्यांदाच मंद्रूपच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू मुस्लिम- शीख-ईसाई एक है,सबका हिंदुस्तान है कव्वालीने गायनाचा प्रारंभ करण्यात आला. हा कवालीचा कार्यक्रम सोलापुरातील सोनाई फाउंडेशनचे युवराज भैय्या राठोड यांनी सर्वधर्मसमभावतेच्या प्रतीकतेचा संदेश दिला आहे.
  या कव्वाली चा कार्यक्रमाचे उद्घाटन मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, सरपंच अनिता कोरे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गटाचे अण्णाप्पा सतुबर यांच्या हस्ते करण्यात आला.
   या कार्यक्रमासाठी मंद्रूपच्या प्रथम नागरिक सरपंच अनिता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माळसिद्ध मुगळे, अध्यक्ष यासीन मकानदार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, सुधाकर कोरे, शिवाजी चव्हाण, रेहाना शेख, ग्रामसेवक नागेश जोडमोठे, शिवपुत्र जोडमोटे, संतोष बरूरे, निंबर्गीचे उपसरपंच पिरसाब हवालदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
   सुमारे सात हजार पेक्षा अधिक जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. या कव्वालीच्या कार्यक्रमातून हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही भाऊ- भाऊ असून ते एकमेकांच्या हातात हात घालून आपल्याला. पुढे जायचं आहे, असा एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads