ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा भव्य नागरी सत्कार... - दैनिक शिवस्वराज्य

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा भव्य नागरी सत्कार...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
बंजारा समाज एक समाज नसून मोठी शक्ती आहे. बंजारा समाजातील लोक प्रामाणिक कष्टाळू असून संकटावर मात करून  पुढे जाणारा समाज आहे. समाजाची प्रगती व्हावी म्हणून प्रत्येक तांड्या वस्तीवर शासनातर्फे विविध विकास कामांसाठी 30 लाखाचा निधी उपलब्ध करून देऊ अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केली. तालुक्यातील बंजारा व लबाना समाजातर्फे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचा भव्य नागरी सत्कार एकलव्य प्राथमिक विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात करण्यात आला. यावेळी तालुक्यातील हजारोच्या संख्येने  बंजारा समाज बांधव उपस्थित होते .                   यावेळी व्यासपीठावर जितेंद्र महाराज पोहरागड, सुनील महाराज ,श्याम चैतन्य महाराज, रायसिंग जी महाराज, श्याम चैतन्य महाराज, उदल महाराज, आरोग्य दूत रामेश्वर नाईक ,संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना  अशासकीय सदस्य उत्तम राठोड,  युवा तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण सर रामकिसन नाईक, जयराम लीकडे गोरख राठोड, दौलत पवार ,रमेश नाईक यांच्यासह बंजारा जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून व आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून बंजारा व लमान समाज तांडा वाड्या वस्तीचा विकास व्हावा या उद्देशाने संत सेवालाल महाराज बंजारा व लमान समाज तांडा समृद्धी योजना अमलात आणण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून तांड्या वाड्या वस्तीवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून विकास केला जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक तांड्याला किमान 30 लाखापर्यंत निधी मिळणार असून या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामे होतील.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads