जामनेर पंचायत समितीच्या बंद शौचालयांवर शिवस्वराज्य न्यूजचा आवाज: सभेत आमदार एकनाथ खडसे यांचीही दखल
जामनेर: पंचायत समितीच्या आवारातील शौचालये बंद असल्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारीचा सर्वात आधी शिवस्वराज्य न्यूजने आवाज उठवला होता. नागरिकांच्या या समस्या प्रसिद्ध करत, शिवस्वराज्य न्यूजने बातमीमधून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या बातमीची दखल घेऊन काल झालेल्या सभेत आमदार एकनाथ खडसे यांनीही हा मुद्दा जोरात मांडला.
खडसेंनी नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होण्याचा हक्क असल्याचे ठामपणे सांगून प्रशासनाला या समस्येचे निराकरण करण्याचे आवाहन केले. आता सर्वांचे लक्ष या शौचालयांवरील लावलेल्या कुलपांकडे लागले आहे प्रशासन नागरिकांसाठी शौचालये उघडणार का, याकडे सर्वत्र उत्सुकता आहे.
शिवस्वराज्य न्यूजच्या या बातमीमुळे जामनेरमधील नागरिकांचे प्रश्न ऐकले जातील अशी आशा निर्माण झाली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा