महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जाण्याच्या विरोधात जामनेरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन...
राज्यातील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जामनेरमध्ये आंदोलन करण्यात आले.सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरित करण्यात येत असल्याने राज्यातील तरुणांना मिळणाऱ्या रोजगारांवर परिणाम होत आहे. या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटाने जामनेरमध्ये निषेध आंदोलन केले. तालुकाध्यक्ष रुपेश दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जामनेर तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना रोजगार मागणीसंदर्भात आणि शासनाच्या धोरणांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश दिनकर पाटील, समन्वयक अर्जुन पाटील, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष आशिष दामोदर, माजी नगरसेवक जावेद मुल्लाजी, किसान सभेचे अध्यक्ष उत्तम पाटील, अनिस पहिलवान, उपसरपंच अमोल पाटील, अमोल पवार, पवन महाजन, संतोष झालटे, अरुण राठोड, बाबू हिवाळे, विक्रम कुमावत, दत्ता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी राज्यातील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा