उद्या जामनेरात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन.. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो - दैनिक शिवस्वराज्य

उद्या जामनेरात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन.. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवार श्री. दिलीप बळीराम खोडपे (सर) यांच्या प्रचारार्थ जामनेरमध्ये उद्या एक भव्य रोड शो आयोजित केला आहे. या रोड शोचे नेतृत्व संसदरत्न खासदार श्री. अमोल कोल्हे करणार असून, हा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे.

रोड शोची रूपरेषा आणि वेळापत्रक:

सुरुवात: जामनेर (मेन रोड) येथे दुपारी १:३० वाजता श्री. अमोल कोल्हे साहेबांचे आगमन व रोड शोची सुरुवात.

पहूर: दुपारी २:२० वाजता

पाळधी: दुपारी २:४५ वाजता

लोहारा: दुपारी ३:१० वाजता

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना खास आवाहन: या कार्यक्रमाद्वारे महाविकास आघाडीचे स्वाभिमानी कार्यकर्ते एकत्र येऊन श्री. दिलीप खोडपे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या उमेदवाराला भरघोस पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे जामनेर परिसरातील नागरिकांमध्ये हा रोड शो पाहण्यासाठी उत्सुकता आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads