महाराष्ट्र
बोरामणी सरपंचानी मंजूर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध केलेले ग्रामपंचायत विवाद जिल्हाधिकारी सोलापूर यांनी फेटाळला.....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : बोरामणी, तालुका-दक्षिण सोलापूर, ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच पुष्पावती आवटे यांनी त्यांच्या विरुद्ध मंजूर करण्यात आलेल्या अविश्वास ठरावा विरुद्ध केलेला ग्रामपंचायत विवाद हा जिल्हाधिकारी, सोलापूर कुमार अशिर्वाद यांनी नामंजूर केला.यात हकीकत अशी की, ग्रामपंचायत बोरामणीच्या सदस्यांनी सरपंच बोरामणी विरुद्ध अविश्वास ठराव तहसिलदार, दक्षिण सोलापूर यांचेकडे दाखल केलेला होता, त्यानंतर तहसिलदार, दक्षिण सोलापूर यांनी अविश्वास ठरावाची विशेष सभा घेतली. त्यामध्ये सरपंच पुष्पावती आवटे यांचे विरुद्ध १६ ग्रामपंचायत सदस्यांनी हात वर करुन अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केलेले होते. त्याविरुद्ध सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकरी, सोलापूर यांचेकडे अविश्वास ठरावाच्या कायदेशीर बाबीवर आव्हान दिले होते. त्यावर ग्रामपंचायत बोरामणी १५ सदस्याचे वकील अॅड. शरद पाटील यांनी सरपंचाच्या ग्रामपंचायत विवादामध्ये कसे तथ्य नाही याबाबत सविस्तर युक्तिवाद केला. तसेच सरपंच यांना तहसिलदार, दक्षिण सोलापूर यांनी अविश्वास ठरावाच्या विशेष सभेमध्ये कशी संधी दिली आहे हे ही स्पष्ट केले. त्याबरोबर बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आलेला आहे याबाबीही जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सर्व बाबींचा विचार करुन जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी सरपंच बोरामणी यांचा ग्रामपंचायत विवाद नामंजूर केला. यात बोरामणी ग्रामपंचायीच्या १५ सदस्यांच्यावतीने अॅड. शरद पाटील यांनी काम पाहिल
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा