गारखेडा बु. येथील सरपंच पतीचे अपहरण – पोलीस तपास सुरू - दैनिक शिवस्वराज्य

गारखेडा बु. येथील सरपंच पतीचे अपहरण – पोलीस तपास सुरू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील गारखेडा बु. येथील सरपंच पती यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना काल घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गंगापुरी येथून त्यांना जबरदस्तीने गाडीत टाकून नेण्यात आले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कासार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads