खान्देशी लिडर वृत्तपत्राचे नवीन वर्षाचे कॅलेंडर प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न...
शिरपूर (जि. धुळे),खान्देशी लिडर वृत्तपत्राच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा शिरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी माजी आमदार बच्चू कडू आणि खान्देशी लिडरचे संपादक वसीम खाटीक यांच्या हस्ते कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बच्चू कडू होते. त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रहार संघटनेच्या अधिकाऱ्यांना त्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश दिले.सोहळ्यास विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रदीप पवार (शिरपूर), सागर पावरा (भोईटी), विशाल कोळी (भोरखेडा), नानेश्वर पावरा, अन्वर भाई, फारुख भाई, रोहित मेंढे, नाजीम भाई, प्रदीप बंड, गणेश पुरहित, शिशिर माकोडे, गोलू ठाकूर, मुन्ना बोंडे, विनोद कोरडे, मंगला कुरवाडे, सारिका दाभाडे, शिंदे ताई, योगिता तायडे, प्रीती पाखेकर यांनी विशेष मेहनत घेतली.याशिवाय दिव्या राऊत, शहनाज परवीन, पेठे ताई, अनिता धाकडे आणि तसरे ताई यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यास विशेष भर देण्यात आला. आगामी काळात खान्देशी लिडर वृत्तपत्राच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि आयोजकांचे विशेष आभार मानण्यात आले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा