महाराष्ट्र
वडापूर जि.प. प्रा. शाळेच्या स्नेहसंमेलनात बहारदार नृत्याविष्कार....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्यविष्कार करून ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उद्योजक विनोद चव्हाण, सरकारी वकील संतोष पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र गुंड, शिक्षण विस्ताराधिकारी गुरुनाथ सनके, केंद्रप्रमुख आमसिद्ध बिराजदार, बाल संस्कार केंद्राचे प्रमुख अरुण पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिवराभिषेक गीत, देशभक्ती, धनगरी, शेतकरी, वारकरी, आदिवासी, कोळी, वाघ्या मुरळी, लावणी अशा विविध प्रकारच्या गीतावर नृत्य सादर करून उपस्थित ग्रामस्थांना ठेका धरायला लावला. मूक नाट्यातून 'हम सब एक है' चा नारा दिला. भावा-भावांनी एकमेकाशी वाद-विवाद न करता आई-वडिलांना सांभाळा तेच आपले आधार आहेत हे नाटकेतून उलगडून दाखवले. बहुरूपी कलाप्रकारातून विद्यार्थ्यांना सर्वांनाच खळखळून हसविले. ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांच्या कलेला भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास शालेय समितीचे उपाध्यक्ष अहमद तांबोळी, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कोळी, सचिन पाटील महेश पाटील ज्ञानेश्वर कोळी, गंगाधर पाटील, अप्पू कोळी, शंकर नळे, विवेक कुलकर्णी, आनंद पाटील, पंकज पाटील, तुकाराम गुरव, राहुल वाघचवरे यांनी सहकार्य केले.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्र. मुख्याध्यापक प्रमोद कस्तुरे, रावसाहेब गिडगोंडे, अनिता कोळी, राजकुमार नडगेरे, इराप्पा कुंभार, सुवर्णा अंजीखाने, शारदा कापसे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुनीर बारूदवाले यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा