उद्या जामनेरात रंगणार नमो कुस्ती स्पर्धेचा थरार.... - दैनिक शिवस्वराज्य

उद्या जामनेरात रंगणार नमो कुस्ती स्पर्धेचा थरार....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 दी.१६ रोजी येथील हिवरखेडा रोड गोविंद महाराज संस्थानच्या पटांगणावर ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने नमो कुस्ती स्पर्धेचा महाकुंभ,देवा भाऊ कुस्ती स्पर्धा पर्व ०२ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रीमंडळातील दिग्गज मंत्री जामनेरात उपस्थीत राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कुस्तीच्या महाकुंभात देश विदेशातील मल्ल सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन आधीच दिली आहे.
कुस्ती स्पर्धा ज्या पटांगणावर होणार आहे त्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू असून कुस्ती स्पर्धा प्रेक्षकांना बसून बघता यावी यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याचे सविस्तर असे की, 16 फेब्रुवारीला 'नमो कुस्ती महाकुंभ'सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
स्पर्धेत प्रमुख 22 लढतींसह 300 पैलवानांच्याही कुस्त्या लावल्या जाणार आहेत. तसेच भारतासह, फ्रान्स, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी, ऑलिम्पियन, हिंद केसरी महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. 


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads