विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीसाठी भिमनगर समिती गठीत....
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर तसेच जगभरात उत्साहात साजरी केली जाते. यंदा जामनेरच्या भिमनगरमध्ये देखील १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२५ साठी सचिन अनिल सुरवाडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रशांत भिवसन सुरवाडे उपाध्यक्ष, राहुल चंद्रकांत इंगळे खजिनदार, महेंद्र भिमराव रणीत सचिव, आदर्श इंगळे सहसचिव, सौरव अवचारे कार्याध्यक्ष, तर शुभम जंजाळे आणि पवन जंजाळे हिशेब तपासणीस म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.या शिवाय, सल्लागार म्हणून गोपाल भीमडे, किशोर तायडे, रमेश सुरवाडे, महेंद्र मोरे, मुकुंद सुरवाडे, विनोद सुरवाडे, सुभाष सुरवाडे आणि अक्षय निराले यांची निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंत सुरवाडे होते. यावेळी सुरेश मोरे, गुड्डू लोखंडे, सुमेध खरे, भूषण सुरवाडे, रोशन सुरवाडे, प्रथमेश सुरवाडे, अरविंद सुरवाडे, खुशाल पानपाटील, नरेंद्र भीमडे, दीपक सुरवाडे, मनोज मोरे, जीवन जंजाळे, मोहित सुरवाडे, अरुण सुरवाडे, श्रवण सुरवाडे, कौशल सुरवाडे आदी भीमसैनिक उपस्थित होते.या समितीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि जयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा