हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु पानंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास जामनेर तालुक्यात पानंद रस्ते खुले करणे मोहिमेस प्रशासनाकडून सुरुवात - दैनिक शिवस्वराज्य

हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु पानंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास जामनेर तालुक्यात पानंद रस्ते खुले करणे मोहिमेस प्रशासनाकडून सुरुवात

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
महाराष्ट्र राज्यातील सर्व शिव पानंद रस्ते खुले करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असून त्या योजनेचा शुभारंभ आज जामनेर तालुक्यात करण्यात आला असून मौजे हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु असा शिव पानंद रस्ता आज रोजी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी व तहसीलदार जामनेर श्री नानासाहेब आगळे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तोंडापूर व ग्राम महसूल अधिकारी तोंडापूर यांनी संबंधित गावचे ग्राम विकास अधिकारी,सरपंच,पोलीस पाटील तसेच शेतकरी ग्रामस्थ यांचे मदतीने सदरचा शिव पानंद रस्ता अतिक्रमण आज रोजी JCB द्वारे काढण्यात येऊन सदरचा पानंद रस्ता शेतकरी बांधवांसाठी खुला करण्यात आलेला आहे.सदर रस्त्याचे एकूण अंतर हे अंदाजे २ किमी इतके असून अतिक्रमीत अंतर 0.500 km इतके आहे.सदर शिव रस्त्याचे अतिक्रमण काढल्याने या भागातील किमान १४० शेतकरी यांना याचा फायदा होणार आहे.सदरच्या मोहिमेतून सर्व शिव पानंद रस्त्याच्या हद्दी निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते तयार करण्यासाठी रोजगार हमी योजना व ग्रामविकास विभागाचे योजनेतून कामकाज करण्यात येणार आहे.सदर खुले करण्यात आलेल्या शेतरस्त्यांची नोंदी गावचे नकाशावर करणे बाबत शासन स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे.तसेच शेतजमिनीच्या वाटप आदेशाचे अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ चे आदेशात देखील शेत रस्त्याचा उल्लेख करणे बाबत निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत.सदर शिवरस्ता खुला केल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवानी शासनाच्या या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.सदरची अतिक्रमण खुले करण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी तोंडापूर विजयकुमार बागडे, ग्राम महसूल अधिकारी श्री घुगे,ग्रामविस्तार अधिकारी,सरपंच व पोलीस पाटील व शेतकरी बांधव यांचे मदतीने लोकसहभागातून खुला करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads