जामनेरच्या विकासाला गती देणारा भागपूर प्रकल्प मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांतून आकारास- हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली; शेती समृद्धीचा नवा अध्याय सुरू - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या विकासाला गती देणारा भागपूर प्रकल्प मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांतून आकारास- हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली; शेती समृद्धीचा नवा अध्याय सुरू

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्याच्या जलसिंचन आणि कृषी समृद्धीच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरत असलेला 'भागपूर प्रकल्प' सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गिरीशभाऊ महाजन यांच्या दीर्घकालीन दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प वास्तवात येत असून, आज त्याला शासनाकडून भरघोस निधी मंजूर झाला आहे.या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर जामनेर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून संपूर्ण तालुक्याचा सामाजिक व आर्थिक चेहरामोहरा बदलणार आहे.

प्रकल्पाचे महत्त्व पुढीलप्रमाणे

सिंचनाखालील क्षेत्र वाढून उत्पादन क्षमता दुपटीने वाढेल.

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बळकट होईल.

जलसंधारणासाठी आधुनिक उपाययोजना राबवली जातील.

जामनेर तालुका जलसमृद्धीच्या दिशेने आगेकूच करेल.
गेली अनेक वर्षे भागपूर प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून, आज प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही काळात जामनेर तालुका नव्या युगात प्रवेश करणार आहे.
गिरीशभाऊंच्या दूरदृष्टीमुळेच आज भागपूर प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेत आहे," असे स्थानिक नागरिक अभिमानाने सांगत आहेत. शेतकरी वर्गाने या प्रकल्पावर मोठ्या आशा टाकल्या असून, भविष्यातील समृद्ध जामनेर हे स्वप्न या प्रकल्पाच्या माध्यमातून साकार होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.


---



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads