दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : २६ मे रोजी गुणपत्रकांचे वाटपशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजता मिळणार मार्कशीट
जळगाव, दि. २० महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या इ. १० वी (माध्यमिक शालांत परीक्षा) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. आता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेची अखेर समाप्ती होणार असून, गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्यात येणार आहेत.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार, २६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रक आणि तपशीलवार गुण नोंद असलेले शालेय अभिलेख वितरित केले जातील.
त्याच दिवशी, दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांना मंडळामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय मंडळांकडून करण्यात आले आहे.
विशेष सूचना : विद्यार्थ्यांनी वेळेत शाळेत उपस्थित राहून आपली गुणपत्रिका घेणे आवश्यक आहे. तसेच, गुणपत्रिका मिळाल्यावर ती नीट तपासून घ्यावी आणि कोणताही गोंधळ असल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा