जामनेर शहरात बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी साहित्य वाटपासाठी ऑनलाईन नोंदणी कॅम्प सुरू – महिलांनी संधीचा लाभ घ्यावा
जामनेर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंत्री मा.ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन नोंदणीसाठी खास कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.हा कॅम्प जामनेर शहरातील गणपती मंदिर, विवेकानंद नगर परिसरात भरविण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ श्रीराम महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दीपक तायडे, अतिश झाल्टे, रविंद्र झाल्टे, बापू लोहार, सुभाष पवार, संजय सूर्यवंशी, मनोज घुले, प्रमोद पालवे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कॅम्पमध्ये ऑनलाईन कार्ड तयार करून नोंदणी केली जात असून, अजून दोन दिवस म्हणजेच दिनांक 11 व 12 रोजीही हा कॅम्प याच ठिकाणी सुरू राहणार आहे. या उपक्रमाचा विशेषतः महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कामगारांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा