पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मलकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड संपन्न.... - दैनिक शिवस्वराज्य

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मलकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड संपन्न....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व दैनिक अहिल्या राज वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते
त्यावेळी 700 प्रस्तावांपैकी निवड करून 260 मान्यवरांना इंडियन एक्सलन्स पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. 
     इंडियन एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजूभाऊ काजळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निलेश तायडे सहा माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई, संदीप काळे ठाणेदार मलकापूर ग्रामीण, भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ, प्रसादभाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा ऊपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, प्रा. डॉ. अनिल खर्चे सर प्राचार्य इंजिनिअरिंग व्ही. भी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज, फारुख शेख ज्येष्ठ पत्रकार लोकमत, पत्रकार होते.
      या कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 
     या कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 देऊन करण्यात आला. 
     यावेळी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
   महिलांसाठी मानाचे असे समजले जाणारे अंगणवाडी शिक्षिका व आशा सेविका भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. 
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गणगे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads