अस्त सूर्याचा" पुस्तकाचे मा. ना. मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते प्रकाशन...
स्वातंत्र्यपूर्व काळातील वीर महाराज यशवंतराव होळकर यांच्या शौर्यगाथेवर आधारित "अस्त सूर्याचा" या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या विशेष प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना विजय वाघ सर म्हणाले, "महाराज यशवंतराव होळकर यांच्या सारखा पराक्रमी योद्धा संपूर्ण हिंदुस्थानात त्या काळात कुणीही नव्हता. त्यांचा इतिहास हा रक्तरंजित असून पराक्रमाने भरलेला आहे. प्रत्येकाने त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला पाहिजे. अस्त सूर्याचा हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी नक्की वाचावे.
कार्यक्रमास मल्हार सेनेचे सरसेनापती सुभाष भाऊ सोणवणे, नगरसेवक जितेंद्र भाऊ पाटील, अरविंद भाऊ देशमुख, प्रभाकर भाऊ न्हाळदे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरसेवक श्रीराम महाजन, बाबुराव अण्णा हिवराळे, डॉ. मनोज विसपुते, दिलीप सोणवणे सर, जगदीश सुशिर सर, प्रदीप सोनवणे सर, संतोष कचरे सर, मधुकर सोणवणे सर, योगेश नेमाडे सर, सुनील धनगर, रघुनाथ सुशिर, विलास साबळे, हिम्मत राजपूत, विशाल सोनवणे सर, गजानन लोणारी आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमातून इतिहासप्रेमींना आणि नव्या पिढीला एक प्रेरणादायी ग्रंथ प्राप्त झाला असून, अस्त सूर्याचा हे पुस्तक वाचकांच्या मनात नक्कीच ठसा उमटवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा