"वृक्षारोपण करूया, पर्यावरण वाचवूया!" ; अनिस सोलापूर शहर शाखेचा उपक्रम.... - दैनिक शिवस्वराज्य

"वृक्षारोपण करूया, पर्यावरण वाचवूया!" ; अनिस सोलापूर शहर शाखेचा उपक्रम....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्यावतीने गुरुवार दि 5 जून रोजी मार्कंडेय उद्यान, अशोक चौक,सोलापूर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी यावेळी कण्हेरी, चाफा, जास्वंद इ विविध प्रकारच्या 20 वृक्षची लागवड केली. 
       हवामान बदल, वाढते प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती आणि जैव विविधता जपणे या सर्व कारणास्तव वृक्ष संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. म्हणून अनिस फक्त विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचे निर्मूलनच करते असे नाही तर अनेक प्रकारचे सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम राबवत असते. जसे की पीओपी गणपती न घेता शाडूची मूर्ती घ्या. होळीत लाकडे कमी प्रमाणात जाळून पोळी गरिबांना वाटा. फटाक्यांचे प्रदूषण करू नका. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करा. इत्यादी. 
      जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण या सदर उपक्रमामध्ये लालनाथ चव्हाण, डॉ अस्मिता बालगावकर, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, विनीत जाधव, निशा भोसले, मधुरा सलवारू, लता ढेरे, शकुंतला सूर्यवंशी, सुनीता गायकवाड, ब्रह्मानंद धडके, विजय जाधव, अजय वाघमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
       🔴अनेक अंधश्रद्धांना खतपाणी घातल्यामुळेच पर्यावरणाची हानी होत असते. म्हणून आपण नेहमी जाणीवपूर्वक पर्यावरण पूरक वर्तन केले पाहिजे. येत्या काळात वृक्ष आणि वनांचे महत्त्व अधिक वाढणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी आणि मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्ष आणि वने अत्यावश्यक आहेत. :- डॉ अस्मिता बालगावकर

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads