जामनेर तालुक्यात संशयास्पद मृत्यू! पोलिसांची बदलती भूमिका; हार्ट अटॅक, अपघात की घातपात? पत्नीचा आरोप - पतीची हत्या, पोलिसांचा संशयास्पद तपास - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यात संशयास्पद मृत्यू! पोलिसांची बदलती भूमिका; हार्ट अटॅक, अपघात की घातपात? पत्नीचा आरोप - पतीची हत्या, पोलिसांचा संशयास्पद तपास

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्याला हादरवणारी घटना पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे आधी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली मात्र या घटनेने एक नवीन वळण घेतली असून नंतर या घटनेला अपघाताचे वळण देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू झाला. मात्र पत्नीच्या व नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असे अर्जात नमूद केले की सुनील शेलेकर यांच्या अंगावरील जखमा पाहून आम्हाला त्यांचा घातपात झाल्याची खात्री झाली आहे मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून सुरुवातीला पोलीस म्हणत होते की त्यांचा हार्ट अटॅक ने घरातच मृत्यू झाला आहे म्हणून आम्ही अकस्मित मृत्यूची नोंद केली मात्र नंतर पोलीस अधीक्षक सो यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्यानंतर तपास केला असता या घटनेने नवीन वळण घेतले या घटनेमध्ये पोलिसांनी दोन जणांना उचलले असता त्यांनी त्याच घरामध्ये पार्टी केली दारू पिले व नंतर संबंधित व्यक्तीला बाहेर घेऊन गेले आणि नंतर ते ती व्यक्ती ट्रॅक्टर वर बसून पडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले व ट्रॅक्टर वरून पडल्याने ट्रॅक्टर खाली टायर खाली आल्याचे सांगितले मात्र तसे डेड बॉडीवरून कुठेही दिसत नाही जर का हा ट्रॅक्टर अपघात असेल तर संबंधितांनी सदर डेड बॉडी हॉस्पिटलला न नेता संबंधित व्यक्तीच्या घरी का आणून टाकली याकडे पोलीस का दुर्लक्ष करीत आहे यांच्यावर दबाव आहे का असा प्रश्न सुनील शेलेकर यांचे नातेवाईक करत आहे पत्नीच्या तक्रार अर्जानुसार तपासी अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पदअसून त्यांनी अर्जात असे म्हटले आहे की
मी आई-वडिलांच्या भेटीसाठी माहेरी बुलढाणा येथे दि. ३१/०५/२०२५ रोजी गेली होती. माझे पती सुनील उदेभान शेलेकर हे एकटेच घरी होते दि.०१/०६/२०२५ रोजी मी रात्री त्यांना फोन केला असता, त्यांचा फोन लागला नाही दि. ०२/०६/२०२५ रोजी मी सकाळी शेंदुर्णी येथे आले असता, घरी माझ्या पतीचा मृतदेह घरात पडलेला आढळला. त्यावेळेस तेथे वैद्यकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच घरमालक उपस्थित होते.
माझ्या पतीच्या अंगावरील जखमा बघून त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट निदर्शनास येत होते. त्यामुळे माझी पूर्णपणे अशी खात्री आहे कि, त्यांना अज्ञात मारेकऱ्यानी मारहाण करून त्यांची हत्त्या केली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मोबाईल फोन फोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी करून मारेकऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मला न्याय देण्यात यावा. याबाबतचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात येऊन चौकशी समिती नेमण्यात यावी. अशी मागणी केली आहे
आपल्या महाराष्ट्रामध्ये एका महिलेला न्यायासाठी वन भटकावे लागत आहे साधी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही म्हणजे महिलेने दाद मागावी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads