सुर नदीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू बैलपोळ्याच्या एक दिवस आधी देवळसगावात हृदयद्रावक घटना – २२ वर्षीय सुशील इंगळे बुडून मृत
जामनेर तालुक्यातील देवळसगाव गावात आज सकाळी बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला शोककळा पसरवणारी घटना घडली. गावातील सुशील सुनील इंगळे (वय २२) हा तरुण आपल्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी सुर नदीकाठी गेला होता. मात्र, नदीचा प्रवाह जोरदार असल्याने तो खोल पाण्यात गेला आणि दुर्दैवाने पाण्याच्या लाटांमध्ये बुडून गेला.
गावकऱ्यांनी आणि उपस्थितांनी सुशीलला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु पाण्याचा जोर जास्त असल्याने सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. काही क्षणांतच हा तरुण चिरनिद्रेत गेला.या अनपेक्षित घटनेमुळे देवळसगाव गावात हळहळ व्यक्त होत असून इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बैलपोळ्याच्या उत्साहावर पाणी फिरवणाऱ्या या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा