लंपी चर्मरोगाचा धोका लक्षात घेऊन यंदा बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन... - दैनिक शिवस्वराज्य

लंपी चर्मरोगाचा धोका लक्षात घेऊन यंदा बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासनाकडून प्राण्यामधील संक्रमण रोखण्यासाठी प्राण्यामधील संक्रमण व संसर्गजन्य रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी बैलपोळा सण असून, परंपरेनुसार हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, बैल एकत्र आणणे किंवा शर्यतींचे आयोजन करणे यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यावर्षीचा बैलपोळा साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिक, पशुपालक तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा अधिनियम २००९ मधील कलम ३१, ३२ व ३३ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जनावरांचे आरोग्य आणि शेतीव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. आपल्या जबाबदार प्रतिसादामुळेच जिल्ह्यातील पशुधनाला लंपीसारख्या संसर्गजन्य रोगापासून संरक्षण मिळनार.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads