जामनेरात खळबळ ... प्रकाश चंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात खळबळ ... प्रकाश चंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 जामनेर तालुक्यातील पळासखेडा शिवारात कार्यरत प्रकाश चंद जैन बहुउद्देशीय संस्था गंभीर अडचणीत सापडली आहे. संस्थेचे चेअरमन राजेश (राजू) कावडीया, सचिव मनोजकुमार जैन, संचालक प्रकाशन ओसवाल व इतर संचालक मंडळींवर शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संस्थेने गट क्रमांक 82/1/21, गट क्रमांक 86/1/9 व गट क्रमांक 86/1/2 या पळासखेडा शिवारातील जमिनीत होमिओपॅथी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च, शारीरिक चिकित्सा व भौतिक उपचार महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी मिळवण्याचा डाव आखला.यासाठी 2008 ते 2018 या कार्यकाळात चेअरमन राजकुमार कावडीया यांनी पळासखेडा ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड छापले, तसेच सरपंच व ग्रामसेवक यांचे डुप्लिकेट सही-सिक्के तयार करून खोटा शिक्का मारला. या आधारे हॉस्पिटल बांधकाम पूर्णत्वाचा बनावट दाखला तयार करून तो थेट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे सादर करण्यात आला.हा प्रकार पहुर येथील सामाजिक कार्यकर्ते ललित लोढा यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आला. त्यांनी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारातून चौकशी केली असता, ग्रामपंचायतीने असा कोणताही दाखला दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संपूर्ण प्रकरणाची सत्यता उघड झाली.हा प्रकार उघड झाल्यावर त्या काळातील तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पुंडलिक महाजन यांनी पोलिसांत औपचारिक तक्रार दिली. त्यानुसार जामनेर पोलिस ठाण्यात IPC कलम 420 (फसवणूक), 463, 464, 465, 466, 468, 470, 471 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads