जामनेरात बोदवड रोडवर गॅस हंडीचा मोठा स्फोट – मोठी दुर्घटना
जामनेर शहरातील बोदवड रोडवर आज सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास मोठा गॅस हंडी स्फोट झाल्याची घटना घडली. गॅस गाडीत भरत असताना हा भीषण स्फोट झाला असून, या दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या स्फोटात सहा ते आठ हंड्यांचा स्फोट झाला असून, त्यामुळे ओमनी कार व मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. ही घटना सलीम शेख यांच्या गॅरेजमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली.
सुदैवाने गॅरेज मोकळ्या जागेत असल्याने मोठा जीवितहानीचा अनर्थ टळला. अन्यथा या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा