महाराष्ट्र
सोलापूरचे पोलीस हवालदार भागवत शिंदे यांची राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर पोलिस दलाचे हवालदार भागवत शिंदे यांची तेलंगणामधील करीमनगर येथे होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय ज्युनिअर, मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
३१ जानेवारी २०२६ रोजी राहुरी (जि. अहमदनगर) येथील विठ्ठल लॉन्स येथे झालेल्या 'ज्युनिअर महाराष्ट्र श्री, मास्टर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा' मध्ये 'मास्टर ४० प्लस' गटात भागवत शिंदे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले.
आगामी राष्ट्रीय स्पर्धा ही ७ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान करीमनगर, तेलंगणा येथील 'व्ही कन्व्हेन्शन सेंटर' मध्ये होईल. या स्पर्धेचे आयोजन 'तेलंगणा बॉडी बिल्डर्स फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन' आणि 'इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन' (IBBF) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापूर पोलीस दलाची शिंदे यांच्या यशामुळे मान उंचावली आहे. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या या यशाबद्दल त्यांना अभिनंदन करत आहेत, आणि सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा