जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक काम करू – अमर पाटील - दैनिक शिवस्वराज्य

जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक काम करू – अमर पाटील


 समीर शेख प्रतिनिधी 
हत्तूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मातोश्री लक्ष्मीबाई रतिकांत पाटील यांनी ८,९८३ मते मिळवत अवघ्या ३४ मतांच्या फरकाने थरारक विजय मिळवला. या विजयामुळे तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील म्हणाले,
   “मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने दक्षिण सोलापूर तालुक्याचा सर्वांगीण व वेगवान विकास साधण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे.”
यावेळी त्यांनी सर्व मतदार, शिवसैनिक तसेच पाटील परिवारावर प्रेम व विश्वास दाखवणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. “जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख निर्णयांच्या माध्यमातून काम केले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
   विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, आगामी काळात तालुक्याच्या विकासासाठी नवे उपक्रम राबवण्याचा निर्धार नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads