पळसखेडे येथे शेतकरी बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बीज उत्पादन उपक्रम - दैनिक शिवस्वराज्य

पळसखेडे येथे शेतकरी बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बीज उत्पादन उपक्रम

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथी कृषिदूतांनी शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित व स्थानिक हवामानास अनुरूप बियाणे योग्य वेळी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बीज उत्पादन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. बदलत्या हवामान परिस्थितीमुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाण्यांची गरज अधिक भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर बीज उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत सुधारित वाणांची निवड कृषीदूतांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. निवडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात शास्त्रीय पद्धतीने बीज उत्पादन केले जाईल. पीक लागवडीपासून काढणीपर्यंत नियमित पाहणी, रोग-कीड नियंत्रण, तणनियंत्रण, आवश्यक खत व्यवस्थापन आणि शुद्धता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे तयार होणारे बियाणे उच्च दर्जाचे व उत्पादनक्षम असेल.

सहभागी शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून बीज उत्पादनाच्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या जातील. तसेच गुणवत्ता तपासणी, बीज प्रक्रिया (स्वच्छता, वाळवणे, ग्रेडिंग) व साठवणूक यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. उत्पादित बियाण्यांची हमीभावाने खरेदी केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित बाजारपेठ मिळेल.

या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर बियाण्यांचा पुरवठा वाढेल, बाहेरील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. बीज उत्पादन उपक्रम हा आत्मनिर्भर व शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे .

सदर उपक्रम कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.एस.देवरे,कार्यक्रम समन्वयक प्रा.बी.एम.गोणशेटवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads