पळसखेडे गावात एकात्मिक रोग-किड व्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती उपक्रम
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
*पळसखेडे गावात एकात्मिक रोग-किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती*
दिनांक -०३/०२/२०२६
शेतकऱ्यांना रोग व किडींच्या प्रादुर्भावातून होणारे नुकसान कमी करण्यासाठी एकात्मिक रोग-किड व्यवस्थापन (IPDM) ही पद्धत प्रभावी ठरत असून, याबाबत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी पालसखेडे गावात मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबवला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना पिकांवरील प्रमुख रोग व किडींची ओळख करून दिली तसेच पिकांची फेरपालट, प्रतिकारक्षम वाणांचा वापर, जैविक कीटकनाशके, सापळे, मित्र कीटकांचे संवर्धन आणि गरजेनुसार मर्यादित रासायनिक उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली.
सदर उपक्रमाचे आयोजन डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षाच्या कृषिदूतांमार्फत करण्यात आले उपक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.एस. देवरे ,कार्यक्रम समन्वयक प्रा. बी.एम. गोनशेटवाड तसेच प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी पार्थ भदाने
महेश पाटील
नवितेजा मेंढे
अमन मोगल
अमीन मुजावर
रोशन नरोडे उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा