राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी मिलींद लोखंडे यांची नियुक्ती... - दैनिक शिवस्वराज्य

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी मिलींद लोखंडे यांची नियुक्ती...

 प्रतिनिधी नितीन इंगळे 
मुंबई, दि. २९ : पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी देशभर सक्रिय असलेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी अनुभवी पत्रकार मिलिंद लोखंडे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. 
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष - श्री. विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष - श्री. बाळसाहेब आढांगळे, राष्ट्रीय प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय महासचिव - श्री.विनोद पवार, राज्य अध्यक्ष विष्णु कंकाळ, राज्य सचिव प्रतिम चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली ही नियुक्ती एकमताने करण्यात आली. लोखंडे यांना अधिकृत नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले आहे.मिलिंद लोखंडे यांनी पत्रकारितेतील एम.ए. (MCJ) शिक्षण पूर्ण केले असून, गेल्या दोन दशकांपासून त्यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल संघटनेतील पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यभरातील पत्रकार बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads