महिला दिनी आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम; नेरी बुद्रुक येथे ५० मुलींना एचपीव्ही लस - दैनिक शिवस्वराज्य

महिला दिनी आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम; नेरी बुद्रुक येथे ५० मुलींना एचपीव्ही लस

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी बुद्रुक येथे एचपीव्ही (HPV) गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.रमेश धापटे उपस्थित होते
कार्यक्रम प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल देसले, डॉ.कांचन गायकवाड,डॉ. सुवर्णा पांढरे,डॉ.गिरीश पाटील,डॉ.नामदेव पाटील, डॉ.अश्विनी कुरणकाळ,सोपान राठोड,नीलिमा गवळी, माया बोरसे, सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व, गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी या लसीचे फायदे तसेच महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी व पालकांनी लसीकरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आरोग्य विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करावे,असे आवाहन केले.
या मोहिमेमुळे परिसरातील मुलींमध्ये गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती होऊन महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सदर उद्घाटनपर शिबिरात परिसरातील ५० लाभार्थींनी लस घेतली.जामनेर तालुक्यात ३६९० तर जळगाव जिल्ह्यात ४१४१६ मुलींना आरोग्य विभागाद्वारे मोफत गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली. खाजगी दवाखान्यात साधारणतः तीन ते दहा हजार रुपये खर्च सदर लसीसाठी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads