जामनेरच्या दोघांचा कारनामा उघड...भुसावळमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या दोघांचा कारनामा उघड...भुसावळमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
भुसावळ शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत एका सक्रिय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल ₹4.65 लाख किमतीच्या 27 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून जामनेर येथील रवींद्र भदाणे आणि गजानन कोळी या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून 27 दुचाकी जप्त केल्या असून त्यामध्ये
 
होंडा शाईन
 बजाज पल्सर
 सुझुकी बर्गमन

यांसारख्या लोकप्रिय वाहनांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि डी.बी. पथकाने या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुचाकीधारकांनी आपल्या वाहनांची योग्य सुरक्षा ठेवावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads