ब्रेकिंग न्यूज: जामनेरमध्ये आत्ताच दुकानाला भीषण आग; दुकान ज्वाळांच्या विळख्यात - दैनिक शिवस्वराज्य

ब्रेकिंग न्यूज: जामनेरमध्ये आत्ताच दुकानाला भीषण आग; दुकान ज्वाळांच्या विळख्यात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरातून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. भुसावळ रोड परिसरातील शेतकी संघ कॉम्प्लेक्समधील एका दुकानाला आत्ताच भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळावरून समोर येणाऱ्या दृश्यांनुसार, आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले असून प्रचंड ज्वाळा आकाशाकडे उसळताना दिसत आहेत. काळ्या धुराचे मोठे लोट परिसरात पसरले असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आहेत. अनेकजण सुरक्षित अंतरावरून परिस्थिती पाहत असून काहीजण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत आहेत.
दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत. आग वेगाने पसरत असल्यामुळे शेजारील दुकानांनाही धोका निर्माण झाला आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जीवितहानीबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अधिक माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा...
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads