अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यातील कर्तृत्ववानांचा गौरव ; ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार सोहळा उद्या सोलापूरात होणार... - दैनिक शिवस्वराज्य

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यातील कर्तृत्ववानांचा गौरव ; ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार सोहळा उद्या सोलापूरात होणार...


 समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ए.डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ चे आयोजन रविवारी (दि. १४) सोलापूर येथे करण्यात आले आहे. राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण, युवक, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण व ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांतील कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र रत्न, महाराष्ट्र समाजरत्न, समाजभूषण, आदर्श व्यक्तिमत्त्व, आदर्श ग्राम, जीवनगौरव यांसह विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात येणार असून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
   ए.डी. फाउंडेशन ही संस्था सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून गोरगरीब, अनाथ, अपंग, वृद्ध तसेच गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करीत आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय जत (जि. सांगली) येथे असून कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेले आहे.
    संस्थेचे संस्थापक अशोक श्रीपती गोरड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, पत्रकार, शिक्षक, उद्योजक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
  हा कार्यक्रम उद्या (दि. १४) सकाळी निर्मिती लॉन्स, नडगिरी पेट्रोल पंपासमोर, सैफुल, विजापूर रोड, जुळे सोलापूर येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads