महाराष्ट्र
जनतेच्या मनात घर करणारे लोकाभिमुख अधिकारी : तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : आपल्या कर्तव्यनिष्ठ, पारदर्शक आणि जनहितैषी कार्यशैलीमुळे नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे मंद्रूपचे माजी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा वाढदिवस विविध स्तरांतून शुभेच्छांच्या वर्षावात साजरा होत आहे.
मंद्रूप येथे अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा, नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली.
त्यांच्या कार्यकाळात लोकसहभागाला प्राधान्य देत प्रशासन अधिक गतिमान व परिणामकारक बनविण्याचा प्रयत्न झाला. प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनहिताची जाणीव या गुणांमुळे त्यांनी सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आणि सन्मान संपादन केला आहे.
प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच समाजातील विविध घटकांशी सुसंवाद राखत त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची आठवण आजही नागरिक आदराने काढतात.
तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत व दैनिक शिवस्वराज्य न्युज पोर्टल चे उपसंपादक समीर शेख व सर्व पत्रकार बांधवांकडू तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा