सार्वजनिक शौचालयात वीजचोरीचा धक्कादायक प्रकार उघड; दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
सार्वजनिक मालमत्ता ही जनतेची संपत्ती आहे आणि तिचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश देत प्रभाग क्रमांक १ मधील इंदिरा आवास परिसरातील सार्वजनिक शौचालयात सुरू असलेल्या वीजचोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
भाजपा नेते रवींद्र झाल्टे यांनी सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली असता, काही व्यावसायिक व घरगुती वापरकर्त्यांनी अनेक महिन्यांपासून शौचालयाच्या वीजपुरवठ्यातून बेकायदेशीररीत्या वीज जोडणी करून वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या अनधिकृत वीजवापरामुळे सार्वजनिक शौचालयाची संपूर्ण विद्युत यंत्रणा जळून खाक झाली असून नागरिकांच्या मूलभूत सुविधेचे मोठे नुकसान झाले आहे.या गंभीर प्रकाराची माहिती तात्काळ नगर परिषद जामनेर प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी नगर परिषद जामनेरच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.तसेच हा संपूर्ण विषय नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीश महाजन व मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.यावेळी भाजपा नेते रवींद्र झाल्टे यांनी सांगितले की, जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून अशा प्रकारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा