पिंपळगाव बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण; ज्ञानदेव सरोदे यांचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या आवारात दि. २० ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव निना सरोदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेचे सुशोभीकरण तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
ज्ञानदेव निना सरोदे हे सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. यावेळी त्यांनी “शाळेला भविष्यात जितक्या वृक्षांची आवश्यकता असेल, तितकी वृक्षरोपे माझ्याकडून उपलब्ध करून देण्यात येतील,” अशी ग्वाही दिली.
वृक्षारोपण कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष कृष्णा उखा पाटील, उपाध्यक्ष विलास सोनवणे, माजी दूध उत्पादक संघ संचालक गुलाबसिंग विठोबा पाटील, शिवसेना शाखाध्यक्ष प्रशांत नामदेव सपकाळे, उपसरपंच जितेंद्र पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष मावळे, विविध सहकारी सोसायटी सदस्य जयराम झटके, समाधान सरोदे, यमुना सरोदे, भावी ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, सागर बावस्कर यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा