महाराष्ट्र
वांगीत वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन....... नवीन कार्यकारिणीची घोषणा; महिलांच्या संघटन बळकटीवर भर....
समीर शेख प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर : वांगी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या वेळी नव्या शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महिलांनी सामाजिक, शैक्षणिक आणि घटनात्मक मूल्यांवर आधारित संघटन मजबूत करून समाजपरिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्वेता राजगुरू होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई गायकवाड, तालुकाध्यक्षा लक्ष्मीताई सोनकांबळे, तालुका महासचिव संगीता पुजारी, सोलापूर शहर युवक महासचिव धर्मराज (अमर) डुरके, माजी तालुका महासचिव श्रीकृष्ण रणदिवे तसेच माजी युवक तालुका अध्यक्ष विकास सोनवणे उपस्थित होते.
यावेळी वांगी शाखेच्या शाखाप्रमुखपदी ग्रामपंचायत सदस्या सुज्ञानी सोनवणे, अध्यक्षा प्रणिती दावणे, उपाध्यक्षा वनिता सोनवणे, महासचिव मंगल सोनवणे, सचिव कविता सोनवणे यांची निवड करण्यात आली. तसेच रेणुका बनसोड, सुवर्णा हेग्ने आणि नागुबाई सोनवणे यांची संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षा श्वेता राजगुरू यांनी महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत संविधान, शिक्षण आणि स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.
जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई गायकवाड व तालुकाध्यक्षा लक्ष्मीताई सोनकांबळे यांनी महिलांनी मोठ्या संख्येने संघटनेत सहभागी होऊन सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, महिला, युवक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा