जिनियस राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा; ६० हून अधिक शिक्षकांचा होणार राज्यस्तरीय गौरव!अमर पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन; गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान
हिवरखेडा बु., ता. जामनेर
जामनेर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षिका, शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच शिक्षणाशी संबंधित विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिनियस मास्टर्स फाऊंडेशन, जामनेर यांच्या वतीने ‘जिनियस राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. अमर पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यात मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक व मान्यवरांना ‘जिनियस राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता, एकलव्य प्राथमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड, जामनेर येथे संपन्न होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान यांची दखल घेत ६० हून अधिक शिक्षक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेले मान्यवर
पठाण फिरोज खान अमानुल्ला खान (गट शिक्षणाधिकारी, यावल), विजय शांतिलाल पवार (शिक्षण विस्तार अधिकारी), गोपाल लक्ष्मण पाटील (मुख्याध्यापक), लहू विक्रम बोराटे, संजय श्रीराम बागुल, पुरुषोत्तम शेबराव पन्हाड, राजेश चौखाजी साळवे, ज्ञानेश्वर रमेश वाघ, हनुमंत वैजनाथ मुंढे, धनराज भिका अहिरे, सदाशिव बालचंद चव्हाण, हेमंत निवृत्ती पाटील, अनिल दत्तात्रय चाचर आदींचा समावेश आहे.
तसेच मीनाक्षी ज्ञानदेव झांबरे, भाग्यश्री निलेश लोहार, सुजाता योगेश अतरेडे, वैशाली रमेश जाधव, उत्तम हिलाल महाजन, प्रविण तुळशीराम सुतार, नयना अजित वानखेडे, विपीन हिरामण वारके, प्रफुल्ल नागराज पाटील, माधुरी हिरामण मोरे, उमेश भालचंद्र चव्हाण, स्वाती सुनील बडगुजर, प्रदीप विश्वासराव पाटील, महेंद्र विश्वासराव पाटील आणि नंदू दौलत पाटील यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय शुभांगी नरेंद्र पाटील (केंद्रप्रमुख), शिवाजीराव संतोष पालवे, दिपक पांडुरंग ढोणी, संजय विजय डांगे, दिलीप दत्तात्रय हुसे, मंगल विश्वनाथ म्हेत्रे, निवृत्ती पंडितराव जोहरे, गंगाराम मधुकर नरवाडे, संतोष शिवदास राठोड, ज्ञानेश्वर शंकरराव पाटील, रेशमा सादिक शेख, ज्ञानेश्वर राजाराम मगरे (पदवीधर शिक्षक), सचिन मनोहर आमले, रेणुका प्रल्हाद जाधव (कासोदे), भास्कर वसंत पाटील, विशाल बळीराम पाटील, सुनिता लहू शेकोकारे, रमाई कडू लोखंडे, फरीदाबी शेख जहूर, साबीर खान शब्बीर खान (ग्रेडेड मुख्याध्यापक) आणि योगेश रामधन बावस्कर यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
तसेच सोपान रघुनाथ आहेर, दिपक पंडित गोयडे, संजय दत्तात्रय सोनार (आरोग्य निरीक्षक), ज्योत्ना सुभाष देवरे, भाग्यश्री साहेबराव सैंदाणे, भगवान पगारे (ज्येष्ठ पत्रकार), वर्षा कैलास काळे (केंद्रप्रमुख), उमेश भगवान हुकुमदार, सुजाता गणपत आहेर, अनिल भानुदास हिवाळे (पत्रकार), दत्तात्रय पांडुरंग रोकडे, मोहनसिंग दौलत खोनगरे तसेच संदीप जगन्नाथ पाटील (शिक्षणनिष्ठ व समर्पण गौरव पुरस्कार) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
‘शिक्षक म्हणजे पिढ्या घडविणारा शिल्पकार!’
“शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो पिढ्या घडविणारा शिल्पकार असतो.”
कर्तृत्ववान शिक्षकांच्या कार्याला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावी आणि समाजात शिक्षकांविषयीचा आदर अधिक दृढ व्हावा, या उदात्त उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याकडे शिक्षण क्षेत्राचे विशेष लक्ष लागले असून, पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शिक्षक व मान्यवरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आयोजक
जिनियस मास्टर्स फाऊंडेशन, जामनेर
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा