जामनेर पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे ॲक्शन मोडवर!पहाटे ४ वाजता अवैध गावठी दारू भट्ट्यांवर धडक; तीन ठिकाणी छापे, ₹१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
जामनेर : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जामनेर पोलिसांनी अवैध दारू निर्मितीविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवून अवैध गावठी दारू निर्मितीच्या ठिकाणांवर धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे ॲक्शन मोडवर येताच पोलिसांच्या पथकाने अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरुद्ध एकूण तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तब्बल ₹१ लाख २० हजार किमतीचे कच्चे रसायन, उकळते रसायन आणि तयार गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी नियमानुसार नष्ट केला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू भट्ट्या चालविणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.आगामी सण-उत्सव काळात अवैध धंद्यांना आळा घालून नागरिकांची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून अशाच प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा