पहूर पेठेत नवदुर्गा मित्र मंडळातर्फे डॉ. स्वप्नील चौधरी यांचे प्रभावी व्याख्यान; मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग - दैनिक शिवस्वराज्य

पहूर पेठेत नवदुर्गा मित्र मंडळातर्फे डॉ. स्वप्नील चौधरी यांचे प्रभावी व्याख्यान; मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

पहूर पेठ येथील देशमुख गल्लीमध्ये नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुणे येथील व्याख्याते, कवी आणि समाजप्रबोधनकार डॉ. स्वप्नील छाया विलास चौधरी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रगतिशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मान्यवरांचा सत्कार; सामाजिक कार्याचा गौरव

कार्यक्रमादरम्यान डॉ. स्वप्नील चौधरी यांचा सत्कार नवदुर्गा मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचा सन्मान केला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई पाटील उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार भाजप महिला आघाडी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती कविता ईश्वर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

मान्यवरांची लाभली उपस्थिती

या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सभापती संजय देवराव देशमुख (पहूर पेठ), प्रविण गावंडे फोटो ग्राफर,धनंजय चौधरी (सोयगाव), प्रगतिशील शेतकरी प्रदीप चौधरी, शेतीमित्र, मनोज चौधरी (भाजप व्यापारी आघाडी उपाध्यक्ष), सागर चौधरी, महेश चौधरी, विजय चौधरी, चेतन चौधरी, प्रवीण पाटील (पालधीचे पोलीस पाटील), सुनील पाटील (प्रगतिशील शेतकरी, सोनाळा), सुभाष पाटील, अर्जुन पाटील, ईश्वर देशमुख (प्रगतिशील शेतकरी, पहूर पेठ), कृष्णा तुकाराम पाटील (पिंपळगाव, रिल स्टार) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

तसेच नवदुर्गा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, दीपक देशमुख, संदीप देशमुख, जय देशमुख, धनंजय पाटील, सोनू देशमुख, श्रीकांत देशमुख, मधुकर देशमुख, राहुल देशमुख, राज देशमुख, विजय पाटील, सचिन देशमुख, बाळू देशमुख आणि संजय पाटील यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांनी केले. उपस्थित मान्यवर, पाहुणे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार डॉ. स्वराज देशमुख यांनी मानले.

नवदुर्गा मित्र मंडळाच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमामुळे पहूर पेठेतील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads